सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आठवतोय का ?

By  
on  

'धुरळा' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर चौथ्यांदा एकत्र झळकल्या होत्या. याआधी 'हाय काय नाय काय', 'झपाटलेला-2', 'क्लासमेट्स' या सिनेमांच्या निमित्ताने त्यांनी एकत्र स्क्रिन शेयर केली होती. मात्र 'धुरळा' सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. या सिनेमाच्या सेटवरील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये सोनाली आणि सईने धमाल डान्स केला होता. 'धुरळा' सिनेमातील 'नाद करा...' या गाण्यावर दोघी थिरकल्या होत्या.

 

 या व्हिडीओत दोघींनी एकाच रंगाची साडी नेसली आहे.धुरळा मधील दोघींची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. शिवाय त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीदेखील कमाल असल्याचं या थ्रोबॅक व्हिडीओतून पाहायला मिळतय. 

 

Recommended

Loading...
Share