By  
on  

“असा बालगंधर्व आता न होणे”, कलाकारांनी बालगंधर्व यांच्या जयंती निमित्त असं केलं अभिवादन

मनोरंजन विश्वात काम करत असताना किंवा या क्षेत्रात येत असताना प्रत्येक कलाकारासाठी कुणी ना कुणी तरी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व असतं. बालगंधर्व हे अशाच काही कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या अभिनयाने हुबेहूब स्त्री भूमिका रंगवून संगीत रंगभूमी गाजविणारे एक प्रतिभावंत कलाकार बालगंधर्व यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने बऱ्याच मराठी कलाकारांनी त्यांना अभिवादन केलं आहे. पडद्यावर बालगंधर्व साकारणारा अभिनेता सुबोध भावेनेही त्यांना अभिवादन केलय. त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करून लिहीलय की, “मराठी रंगभूमीचे मानबिंदू बालगंधर्व! आज बालगंधर्वांची १३२ वी जयंती,त्यांना विनम्र अभिवादन.” 

तर बालगंधर्व या सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मानवंदना अर्पण केली. ते लिहीतात की, “जसा जन्मतो तेज घेऊन तारा! जसा मोर घेऊन येतो पिसारा! तसा येई घेऊन कंठात गाणे! असा बालगंधर्व आता न होणे! रतीसारखे जया रुपलावण्य लाभे! कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे! सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे! असा बालगंधर्व आता न होणे! बालगंधर्व यांच्या १३२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.”
सोशल मिडीयावर बालगंधर्व यांच्या जयंती निमित्ताने विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जसा जन्मतो तेज घेऊन तारा! जसा मोर घेऊन येतो पिसारा! तसा येई घेऊन कंठात गाणे! असा बालगंधर्व आता न होणे! रतीसारखे जया रुपलावण्य लाभे! कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे! सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे! असा बालगंधर्व आता न होणे! बालगंधर्व यांच्या १३२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive