By  
on  

पाहा Video : हॉरर सिनेमे पाहताना क्रांती रेडकरची होते अशी अवस्था

सोशल मिडीयावर अभिनेत्री क्रांती रेडकर विविध व्हिडीओ पोस्ट करते. यात काही मेकअप टीप्स व्हिडीओही ती पोस्ट करते. लॉकडाउनच्या काळातही क्रांतीचे काही एन्टरटेनिंग व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. 

क्रांती नुकताच आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती हॉरर सिनेमा पाहत असल्याचं पाहायला मिळतय. क्रांती हॉरर सिनेमा पाहत असताना नेमकं काय काय घडतं, ती काय बोलते, काय करते या सगळ्या गोष्टी या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. हॉरर सिनेमा पाहताना अशी अवस्था कित्येकांची होत असेल आणि कित्यके जण हा व्हिडीओ पाहून त्यांच्यासोबतही असचं होतं असं म्हणत आहेत. क्रांती तिच्या पतीसोबत जेव्हा हॉरर सिनेमा पाहता तेव्हा काय घडतं हे या व्हिडीओत पाहणं मजेशीर ठरतय.

 

सोशल मिडीयावर क्रांतीच्या या व्हिडीओला पसंत केलं जातय.

शिवाय कलाविश्वातील तिच्या काही मित्र-मैत्रीणींनीही हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive