लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा नवा पॉडकास्ट शो सुरु केला होता. सोनाली सांगते ऐका असं या पॉडकास्ट शोचं नाव आहे. जवळपास 11 भाग केल्यानंतर सोनालीने या पॉडकास्ट शोपासून ब्रेक घेतला आहे. सोनालीने क्षणभर विश्रांती असा पॉडकास्टचा शेवटचा भाग पोस्ट केला आहे. या भागात सोनालीसोबतच तिच्या आत्तापर्यंत भागाविषयी प्रतिक्रिया देणारे व्हॉईस मेसेज या भागात आहेत. या भागासह तिने तिच्या पॉडकास्ट शोची सांगता केली आहे.
सोनालीने या तिच्या विविध पॉडकास्ट भागात तिचं खासगी आयुष्य, कॉन्ट्रोवर्सी, आनंदी क्षण, दु:खी क्षण या सगळ्या गोष्टी शेयर केल्या. तिच्या चाहत्यांना माहिती नसलेल्या गोष्टी तिने या पॉडकास्टमध्ये सांगीतल्या. शिवाय बऱ्याच गोष्टींविषयीचा खुलासा करत काही गोष्टी स्पष्ट केल्या.
सोनाली सध्या तिचा फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. आणि लवकरच मायदेशी परतण्याची वाट पाहतेय.