By  
on  

सोनाली कुलकर्णी आता वाचतेय हे पुस्तक, दुबईत अशी मिळवली मराठी पुस्तके

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. लॉकडाउनच्या आधीपासूनच सोनाली दुबईत आहे. मात्र ती आता लवकरच मायदेशी परतण्याची वाट पाहतेय.

दुबईत सोनाली विविधं गोष्टी करतेय. तिने तिचा पॉडकास्ट शो देखील सुरु केला होता. शिवाय फिटनेसकडेही ती विशेष लक्ष देत आहे. शिवाय तिथे काही पुस्तकही सोनाली वाचतेय. या लॉकडाउनमध्ये सोनालीला वाचनाची आवड निर्माण झाली आहे. नुकतच सोनालीने मृत्युंजय हे पुस्तक वाचून पूर्ण केलं होतं. आणि आता युगान्त हे पुस्तक ती वाचतेय. नुकतीच याविषयीची पोस्ट सोनालीने केली आहे. पोस्टमध्ये ती लिहीते की, “’मृत्युंजय’ नंतर ‘युगान्त’ , तुम्ही विचार करत असाल लॉकडाउन चालू असताना, इथे दुबईत बसून मी मराठी पुस्तके कुठून मिळवली, तर इथे असलेल्या पेशवा नावाच्या खानावळीतून.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‘मृत्युंजय’ नंतर ‘युगान्त’ तुम्ही विचार करत असाल lockdown चालू असताना, इथे, दुबईत बसून मी मराठी पुस्तके कुठून मिळवली.....!!! तर इथे असलेल्या ‘पेशवा’ नावाच्या खानावळीतून. ‘पेशवा’ गेली अनेक वर्षं UAE मध्ये मराठमोळी खाद्यसंस्कृती तर जपतायत, पण त्याच बरोबरीने मराठी साहित्य आणि वाचनाची आवड असलेल्यांसाठी देखील खाद्य पुरवतायत... @sachin_narhar_joshi आणि @shriyajoshi.30 तुमच्याबद्दल अभिमान तर वाटतोच तसेच तमाम मराठी माणसांच्या वतीने कृतज्ञता पण व्यक्त करावीशी वाटते #जयमहाराष्ट्र P.S. आताच ‘मयसभा’ वाचून झालं, पुढे वाचायला घेते

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

दुबईतील या खानावळीत सोनालीला मराठी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. आणि वाचनाची आवड ती अशी पूर्ण करताना दिसत आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात सोनाली आणि कुणालचा साखरपुडाही पार पडला होता. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive