चार वर्षांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने केली होती ही गोष्ट, अशी शेयर केली आठवण

By  
on  

अभिनेता सुयश टिळकला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यासोबतच त्याला फोटोग्राफीचीही आवड आहे. अभिनेता म्हणून काम करत असताना तो त्याची फोटोग्राफीची आवडही जोपासत असतो. शिवाय विविध प्रकारच्या झाडांविषयी ही त्याला आवड आहे. नुकतच सुयशने त्याची एक चार वर्षांपूर्वीची आठवण शेयर केली आहे. 

सोशल मिडीयावर सुयशने पोस्ट करून एक छान अनुभव शेयर केला आहे. चार वर्षांपूर्वी सुयशने एक रोपटं लावलं होतं. आणि त्या रोपट्याचं आता झाडात झालेलं रुपांतर पाहून सुयशला प्रचंड आनंद झाला आहे. सुयशने चार वर्षांपूर्वीच्या त्या रोपट्याचा आणि आता त्या झाडा फोटो पोस्ट केला आहे.

 

सुयशच्या घरातही विविध प्रकारची झाडं, फुलं आहेत. निसर्गप्रेमीसोबतच तो एक प्राणीप्रेमी देखील आहे.

Recommended

Loading...
Share