लग्न ही गोष्ट प्रत्येकासाठी खास असते. आणि त्यातच लग्नाची आठवण असलेले फोटो कायम त्या आठवणींना ताजं करतात. अभिनेत्री अमृता सुभाषनेही अशाच काही खास आठवणी सोशल मिडीयावर शेयर केल्या आहेत.
अभिनेत्री अमृता सुभाष आणि पति संदेश कुलकर्ण यांच्या लग्नाला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि याच निमित्ताने अमृताने त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघांचे वडिल देखील आहेत. आणि त्याचविषयीची या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमृता लिहीते की, “आज लग्नाला १७ वर्षं झाली. पुढच्या फोटोत मी संदेशला पेढा भरवत असताना मागे उभ्या असलेल्या दोन्ही बाबांच्या चेहर्यावरचे भाव अमूल्य आहेत. मी माप ओलांडताना संदेश माझ्या पाठीशी उभा आहे तो आजतागायत.कृतज्ञ.”
या लग्नाच्या फोटोरुपी सोनेरी आठवणी अमृता आणि संदेशला पुन्हा आनंद देऊन गेले असतील एवढं नक्की.