मराठी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा यापलिकडे गश्मीरने आपल्या अभिनयातून स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. या हॅण्डसम अभिनेत्याच्या घरी आनंदाला उधाण आलं आहे, ते म्हणजे त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं नुकतंच आगमन झालं आहे. गश्मीर आणि त्याची पत्नी गौरीने एका गोड बाळाला 21 डिसेंबर रोजी जन्म दिला आहे.
इंस्टाग्रामवर खुद्द गश्मीरनेच ही गोड बातमी बाळाच्या फोटोसह आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पिता होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. म्हणूनच पिता झाल्याची जबाबदारी त्याच्या या पोस्टवरुनच स्पष्ट झळकत होती. तसंच त्याला आपल्या बाळाचं नावसुध्दा ठेवायचंय, पण तत्पूर्वी तो म्हणतो ह्याला ज्युनियर गश्मीर म्हणायला हरकत नाही.
https://www.instagram.com/p/BskrDdMnBNJ/
गश्मीरने 'देऊळ बंद' , 'कॅरी ऑन मराठा', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'कान्हा' यासारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच त्याचा 'एक राधा एक मीरा' हा सिनेमासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गश्मीर आता रंगभूमीवर पण झळकतो आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर येत असून या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारतो आहे.