By  
on  

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मध्ये सामिल होणार रिंकू-आकाश

आर्ची आणि परशा या जोडीने महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला याड लावलं. 'सैराट' सिनेमातील हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे जोडपं म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांचे गॉडफादर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'मध्ये हे दोघं सामिल होणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा सिनेमा बराच चर्चेत आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नागराज मंजुळे आणि बिग बी हे समीकरण पाहण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. बिग बी हेसुध्दा नुकतंच काही दिवसांपासून या सेटवरील अनेक फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. त्यामुळे सर्वांनाच झुंडबाबत आणखी उत्सुकता वाढलीय. त्यात आता भर पडलीय ती रिंकू व आकाशची.

रिंकू व आकाशने आठवडाभर नागपुरात झुंड सिनेमासाठी शुटींग केल्याची माहिती मिळते आहे. रिकू आणि आकाशने एका रात्रीत स्टार होणं काय असतं, ते सैराटमुळेच चांगलंच अनुभवलंय. बिग बींसोबत काम करायला मिळाल्याने साहजिकच हे दोघंही प्रचंड खुश आहेत. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर रिंकू आणि आकाश फूटबॉलपटूंच्या भूमिकेत असणार आहेत.

रिंकूचा आता सैराटनंतर कागर हा दुसरा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. तर आकाशने फन अनलिमिटेड हा सिनेमा आणि लस्ट स्टोरीज या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive