लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद होतं. मात्र सरकारच्या परवानगी नंतर नियमांचं पालन करत आता चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात झाली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या धमाल कॉमेडी शोचं चित्रीकरणही बंद होतं. मात्र या कार्यक्रमाचे जुने भाग प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. मात्र नुकतीच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही सुरवात झाली आहे.
या कार्यक्रमाची सुत्रसंचालक प्राजक्ता माळीने सेटवरील काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. जवळपास साडे तीन महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने त्याचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.
या पोस्टमध्ये ती लिहीते की, “अखेर... साडे ३ महिन्यांनंतर चेहऱ्याला रंग लावला. होय.. “महाराष्ट्राची हास्यजत्रा”च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नियट आणि अटीचं पालन करून काळजी घेत आहोत..योगायोग पहा.. काल ह्या अवलियाचा वाढदिवस होता.. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत काढलेला सेल्फि.”
अभिनेता समीर चौगुलेदेखील या फोटोत आहे. त्यांच्यासोबत प्राजक्ताने सेल्फि क्लिक केला आहे. तेव्हा लवकरच आता या कार्यक्रमाचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.