आपल्याकडे एखादा ट्रेण्ड आला की सर्वच त्यात वाहून जातात, आता हेच पाहा ना.....क्रिकेटर्सचे महिला वेषातले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच या फेस अॅपची भुरळ पडली. अनेक तरुणांनी आपले फोटो ा अॅपमध्ये महिला वेषात रुपांतरीत केले. सैराट फेम परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरच्या या फेसअॅप फोटोंनंतर आता स्टार प्रवाहवरील 'विठु माऊली' फेम अजिंक्य राऊतलाही त्याची भुरळ पडली आहे.
अभिनेता अजिंक्य राऊतचे हे फेसअॅपमधील फोटो एखाद्या सुंदरीलासुध्दा लाजवतील असेच आहेत.
हे फोटो पोस्ट करत अजिंक्यने चाहत्यांना यापैकी तुम्हाला कुठला फोटो आवडला, असा सवाल केला आहे. तर चाहत्यांनी सर्वच फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'विठु माऊली' मालिकेत श्री विठ्ठल साकारुन अजिंक्यने सर्वांचीच मनं जिंकली.