या मालिकेमुळे या मराठी अभिनेत्रीचे झाले 1 मिलियन फॉलोवर्स 

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' ही प्रेक्षकांच्या आवडत्या मराठी मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील पात्र आणि ते साकारणारे कलाकार यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती तर मिळालीच शिवाय त्यांच्यावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव सतत होत असतो. सोशल मिडीयावर तर या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. राणादा सोबतच पाटकबाई देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. हीच पाठकबाई साकारली आहे अभिनेत्री अक्षया देवधरने. या मालिकेतील या भूमिकेमुळे अक्षयाला प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या आणि त्यांचं प्रेमही मिळालं. तिचा मोठा चाहतावर्गही तयार झाला. सोशल मिडीयावर तर तिच्या एका फोटो किंवा व्हिडीओवर असंख्य कमेंट्स आणि लाईक्स असतात. 

आणि याच सोशल मिडीयावर अक्षयाला नुकतीच मिळाली आहे एक गुड न्यूज. तिच्या इन्स्टाग्रामवरी फॉलोवर्सचा आकडा वाढून आता तो चक्क एक मिलियन झाला आहे. म्हणजे तब्बल दहा लाख फॉलोवर्स इन्स्टाग्रामवर अक्षयाला फॉलो करतात. हा आनंद तिने तिच्या पोस्टमधून शेयर केला आहे.

या पोस्टमध्ये ती लिहीते की, “हॅलो, 1 मिलियन फॉलोवर्स ! जेव्हा मी इन्स्टाग्राम वापरायला सुरुवात केली तेव्हा विचारही केला नव्हता की इथपर्यंत येईल. मला फक्त सगळ्या फॉलोवर्सचे आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. काळजी घ्या आणि आनंदी राहा. आणि धन्यवाद तुझ्यात जीव रंगला. हे सगळ्य तुझ्यात जीव रंगला मुळेच झालय.”
असं म्हणत तिने याचं श्रेय तिच्या या मालिकेला दिलं आहे. 
 

Recommended

Loading...
Share