लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत कित्येकांना वारी करता आली नाही. मात्र दरवर्षी वारी करणाऱ्यांना वर्च्युअल पध्दतिने विठुरायाला नमन केलं.
अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबानेही यंदा व्हर्च्युअल वारी केली आहे. पत्नि मंजिरी भावे आणि तिच्या वारी ग्रुपने मिळून 18 दिवस भावे कुटुंबाने हरिपाठ केला आणि याचा समारोप आज पहाटे विठ्ठल-राखुमाईच्या पूजेने झाला.
याविषयी सांगाताना मंजिरी भावे लिहीतात की, “2 वेळा आळंदी - पंढरपूर आणि 2 वेळा टप्प्या टप्यात मला माऊली कृपेने वारी करण्याचा योग आला आहे. ह्या वर्षी जमलं असतंच असं नाही पण आमच्या वारी च्या group मधील शिरीष काकाने e-वारी ची कल्पना सुचवली. त्या प्रमाणे आम्ही रोज संध्याकाळी एकत्र online हरिपाठ म्हणायचो. दिवसभर कोणी ना कोणी वेग वेगळे स्तोत्र, श्लोक, अभंग,गीता गीताई चे अध्याय म्हणून group वर post व्हायचे. मागील वारी च्या आठवणी , किस्से, फोटो गप्पा असं सगळं चालू होतं गेले 18 दिवस. आज पहाटे 4.15 वाजता आम्ही एकत्र येऊन online पूजा केली. पांडुरंगाची आरती, अभंग, गाणी, दृष्ट इ. म्हणून आमची virtual वारी पांडुरंगाच्या कृपेने आणि group मधील सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या वर्षी संपन्न झाली. राम कृष्ण हरी. आज सगळ्यांनी घरात छोटी आरास केलीय.. मुलांच्यात रमणारे आमचे विठोबा रखुमाई... आमचा Dominos चा देव्हारा.”
विठ्ठल-राखुमाईच्या पूजेचा फोटो पोस्ट करून सुबोध भावे लिहीतात की, "विठोबा-रखुमाई" हेचि दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा!(मंजिरी आणि तिच्या वारी ग्रुप नि गेली १८ दिवस केलेल्या हरिपाठाचा समारोप पहाटे ४ वाजता विठ्ठल -राखुमाईच्या पूजेने झाला).”