By  
on  

वारकरऱ्याचा पेहराव करून नृत्यांगनाने दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

 आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विठूमाऊलीला नमन करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत.

नृत्यांगना आणि अप्सरा आली शो फेम माधुरी पवारनेही विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिचा पारंपारिक पेहराव पाहायला मिळतोय. मात्र साडी नाही तर धोतर फेटा घालून वारकऱ्याच्या वेशभुषेतील माधुरी पवारने फोटो पोस्ट केले आहेत.


सोशल मिडीयावर माधुरीच्या या फोटोंचं कौतुक होताना पाहायला मिळतय. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. 'अप्सरा आली' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाची माधुरी विजेती आहे. सोशल मिडीयावर तिचे डान्स व्हिडीओ चर्चेत असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive