तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही.
विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांचा विचार करून आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या सादरीकरणात कोल्हापूर फिल्म कंपनी घेऊन आली आहे. कोल्हापूर फिल्म कंपनीच्या सचिन सुरेश गुरव यांची निर्मित, संकल्पना असून संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे, पार्श्वसंगीत अमित पाध्ये यांनी दिले असून प्रथमेश रांगोळे यांच्या छायाचित्रणातून हे दर्शन आपल्याला घेता येणार आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीच्या उत्तम सादरीकरणातील हा व्हिडीओ भावूक करतो. व्हिडीओच्या शेवटी कंठ दाटून येतो, आणि डोळ्यात नकळत अश्रू येतील असा हा व्हिडीओ एका वेगळ्या संकल्पनेसह विठ्ठलाची भक्ती सांगतो.
असं विठ्ठलाचं आगळंवेगळे दर्शन सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनीने ' विठ्ठल भक्तांचरणी रुजू केलं आहे..