विठूरायाच्या भक्तीत त्याच्या मूर्तीत एक वेगळीच प्रसन्नता आहे. त्या मूर्तीसमोर उभं राहिलं की वेगळीच ऊर्जा मिळते. हिच ऊर्जा आपण लाखो वारकऱ्यांमध्ये पाहतो.
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने तिच्या आयुष्यातील एक अशीच गोष्ट आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेयर केली आहे. ती यो पोस्टमध्ये विठूरायाच्या मूर्तीसोबतचा फोटो पोस्ट करून लिहीते की, “मूर्तीवर विश्वास न ठेवणारी मी, या मूर्ती पुढे मात्र माझे आश्रु नाही रोखू शकले अन् माझेही 'माहेर पंढरी' झाले”
विठूमाऊलीच्या मूर्तीला पाहून भाग्यश्री भावुक झालेली या फोटोत पाहायला मिळतेय.