अभिनेत्री सायली संजीव शिकतेय हे वाद्य, वाजवलं 'विठू माऊली तू..'

By  
on  

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कित्येकांनी केला आहे. या मिळालेल्या वेळेत नवनवीन गोष्टी काहींनी शिकल्या. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही बंद होतं. म्हणूनच कला विश्वातील कलाकार मंडळी घरातच होती. नुकतीच चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होत आहे. अभिनेत्री सायली संजीवनेही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला आहे.  हार्मोनियम अर्थात पेटी हे वाद्य ती शिकतेय.

सायलीने तिचे पेटी वाजवतानाचे काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिने एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती पेटी वाजवताना दिसत आहे. 'विठू माऊली तू' हे भक्ती गीत तिने या पेटीवर वाजवलं आहे.

 

विविध मालिका आणि सिनेमांमध्ये सायलीने आत्तापर्यंत उत्तोमत्तम काम केलं आहे. 'गोष्ट एका पैठणीची' या आगामी सिनेमातही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share