सेटवर तेजसला भेटला नवा मित्र, नुकतीच केली चित्रीकरणाला सुरुवात

By  
on  

सरकारच्या परवानगीनंतर ठप्प झालेलं मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नियमांचे पालन करुन आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन चित्रीकरण केलं जात आहे.

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचही चित्रीकरण सुरु करण्यात आलय. या मालिकेतील कलाकार सेटवर पोहोचून आनंदी आहेत. अभिनेता तेजस बर्वेला मात्र या दरम्यान नवा मित्र भेटला आहे. सेटवरील त्याचा हा मित्र म्हणजे सेटवर हिंडायला आलेल माकड आहे. या माकडाला तेजस खायला खाऊ देत आहे. आणि असाच एक व्हिडीओ तेजसने पोस्ट केला आहे. मालिकेतील त्याची कोस्टार अमृता धोंगडेने हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ शूट करण्यासाठी तेजसनेअमृताचे आभार मानले आहेत.

 

सध्या काही कलाकार हे बऱ्याच दिवसांनी सेटवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सोशल मिडीयावर त्यांचे आणखी काही फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळणार एवढं नक्की.

 

Recommended

Loading...
Share