अभिनेता सौरभ गोखलेला आली या भूमिकेची आठवण, साकारली होती संत ज्ञानेश्वरांची भूमिका

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी प्रत्येक भूमिका या कायम महत्त्वाच्या आणि खास असतात. मात्र काही अशा भूमिका या कलाकारांच्या वाट्याला येतात ज्यात जबाबदारीचं काम असतं. अभिनेता सौरभ गोखलेला अशी संधी एकदा नाही तर दोनदा चालून आली. आवाज या मालिकेत त्याने संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तू माझा सांगाती या मालिकेतही त्याला या भूमिकेसाठी विचारलं गेलं. या मालिकेतही सौरभने संत ज्ञानेश्वर यांची भूमिका साकारली होती.

याच भूमिकेची आठवण सौरभने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर केली आहे. तो लिहीतो की, "संत ज्ञानेश्वरांसारखी असामान्य व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांना पडद्यावर अगदी थोड्या काळासाठी साकारल्यानंतरही पुढील प्रत्येकवर्षी त्या अनुभवाची आठवण येते आणि अंगावर रोमांच उभे राहतात.. धन्यवाद वीरेंद्र प्रधान आणि कलर्स मराठी."
या भूमिकेसाठी सौरभने पुन्हा एकदा दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान आणि कलर्स मराठी यांचे आभार मानले आहेत. दोन्ही वेळा साकारलेली ही भूमिका म्हणजे सौरभसाठी जबाबदारीचं आणि अवघड काम होतं. मात्र ते त्याने उत्तमरित्या साकारलं आणि प्रेक्षकांच्या पसंतीचीही पावती मिळवली होती.

यासोबतच त्याने या पोस्टमध्ये या मालिकेतील त्याचा संत ज्ञानेश्वर यांच्या पेहरावातील भूमिकेतला फोटोही पोस्ट केला आहे.

अभिनेता सौरभ गोखले हा विविध मालिका आणि सिनेमांमध्ये झळकताना दिसतो.'सिम्बा' या हिंदी सिनेमातीही त्याने खलनायक साकारला होता. त्याचं या सिनेमातील कामाचही कौतुक झालं होतं.

Recommended

Loading...
Share