लॉकडाउनच्या काळात सध्या सिनेमागृहे आणि नाट्यगृहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंदच आहेत. सिनेमांसाठी सध्या ओटीटी हा पर्याय असल्याने काही सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. मात्र नाट्यरसिकांचं काय ? त्याने नाटक कुठे पाहता येणार ? आणि म्हणूनच हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेने 'मोगरा' हे नाटक नाट्यरसिकांसाठी भेटीला येत आले. या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी दिसणार आहे. तर तेजस रानडे यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे.
नाट्यरसिकांना त्यांच्या आवडत्या नाट्यगृहात म्हणजेच घरबसल्या हे नाटक पाहता येणार आहे. या लाईव्ह ऑनलाईन नाटकाला 'नेटक' असं नाव देऊन हे पहिलं वहिलं नेटक येत्या 12 जुलैला भेटीला येणार आहे. या दिवशी या नाटाकाच्या शुभारंभाचा प्रयोग असेल. तेव्हा थेट घरात बसून हे नाटक नाट्यरसिकांना अनुभवता येणार आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीने याविषयीची माहिती सोशल मिडीयावर दिली आहे. शिवाय या नाटकाचा टिझरही प्रदर्शित केला आहे. या नाटकाविषयीची अधीक माहिती देखील लवकरच समोर येईल.