सचिन कुंडलकर हे दिग्दर्शनातील वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखले जातात. सध्या ते पाँडिचेरीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर हे कलाकार आहेत. पण या यादीत आणखी एका कलाकाराची भर पडली आहे.
महेश मांजरेकरही या सिनेमात व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं अलीकडेच स्पष्ट झालं आहे. सचिन कुंडलकरांनी सोशल मिडियादवारे महेश देखील या सिनेमाचा महत्त्वाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबद्दल लिहिताना ते म्हणतात, ‘आताच एका कुलेस्ट मित्राने पाँडिचेरीची टीम जॉईन केली आहे. महेश मांजरेकर तुमचं स्वागत आहे. तुमचा वैशिष्ट्यपूर्ण भूमिका असलेल्या या सिनेमात काम करायला मजा येईल.
या सिनेमाचं सगळं शुटिंग स्मार्टफोनद्वारे केलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा एक वेगळा प्रयोग असल्याचं सचिन कुंडलकर आवर्जून सांगतात. या सिनेमाची पटकथा सचिन आणि तेजस मोडकने लिहिली आहे.
https://www.instagram.com/p/BspZuwrBjZ3/?utm_source=ig_web_copy_link