पुष्कर जोगने 'सिम्बा' रणवीर सिंहला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला हा व्हिडीओ

By  
on  

एनर्जीचा धमाका म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवुड स्टार रणवीर सिंहवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन विश्वातील कलाकार त्याला सोशल मिडीयावर त्या शुभेच्छा देत आहेत. कुणी त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करतय तर कुणी त्याच्यासोबतचे व्हिडीओ. त्याच्यात असलेली कमाल एनर्जी, त्याचा अभिनय यांच्यासह सिनेमातील त्याची गाणीही चर्चेत असतात. अशाच एका गाण्यावर परफॉर्म केलं होतं अभिनेता पुष्कर जोगने.

अभिनेता पुष्कर जोगने बॉलिवुडच्या या सिम्बाला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. पुष्करने एका अवॉर्ड सोहळ्यात रणवीरच्या सिम्बा सिनेमातील गाण्यावर परफॉर्म केलं होतं. आणि हाच व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "जसं तुझ्या वाढदिवसाला डान्स करतोय, अजूनही तुझी एनर्जी मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा चॅम्प." 

 

अभिनेता पुष्कर जोग हा एक उत्तम डान्सर सुध्दा आहे. त्यामुळे त्याने त्याच्या डान्सच्या माध्यमातून रणवीर सिंहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share