By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीने पोस्ट केले सेटवरील हे फोटो, पाहा सुमीचे सेल्फि

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मागील तीन महिने घरातच असलेले कलाकार चित्रीकरण सुरु झाल्याने आनंदी आहेत. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कलाकार त्यांचे घरातले फोटो, किंवा त्यांचा छंद जोपासतानाचे फोटो पोस्ट करत होते. आता मात्र कलाकार चित्रीकरणाच्या सेटवरील फोटो पोस्ट करताना दिसत आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे चित्रीकरण सुरु झाल्याने प्रचंड आनंदी झाली आहे.  त्यामुळे सकाळी सेटवर पोहोचताच अमृताने काही सेल्फि देखील क्लिक केले आणि ते सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. चित्रीकरण सुरु झाल्याने या कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

य़ा मालिकेतून अमृता ही सुमी नावाने प्रसिध्द झाली आहे. शिवाय प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही तिला मिळाली आहे. तिच्या या मालिकेतील भूमिकेच्या अभिनयाचंही कौतुक होत असतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive