By  
on  

'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर' मालिकेतील या अभिनेत्याला झाला कोरोना, चित्रीकरण केलं बंद

एकीकडे लॉकडाउन असतानाही कोरोनाग्रस्त परिस्थितीत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर दुसरीकडे सरकारच्या परवानगीने मनोरंजन विश्वातील चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात झाली आहे. यात 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर' या मालिकाच्या सेटवर कोरोना येऊन पोहोचलाय. या मालिकेचं चित्रीकरण सध्या मुंबईत सुरु आहे. एन्ड टीव्ही वाहिनीवर ही मालिका प्रसारित होते.

या मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या जगन्नाथ निवंगुणे यांना कोरोनाने ग्रासलं आहे. याआधी ते अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकले आहेत. मात्र जगन्नाथ यांना कोरोनाची लागण झाल्याने मालिकेच्या सेटवर तारांबळ उडाली आहे. आणि लगेचच चित्रीकरणही बंद करण्यात आले आहे. शिवाय इतर कलाकारांच्या टेस्टही करण्यात येत आहेत.सध्या जगन्नाथ यांच्यावर वरळीत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं कळतय.

याआधी 'मेरे साई' या मालिकेच्या सेटवरील एका क्रू मेम्बरला कोरोना झाल्याने या मालिकेचंही चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. मात्र पुन्हा या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive