By  
on  

अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अक्षय बर्दापुरकर घेऊन येत आहे पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

अभिनेता पुष्कर श्रोत्री, निर्माते अक्षय बर्दापूरकर, व संगीत संयोजक आदित्य ओक मिळून  मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. प्लॅनेट मराठी सोबत त्यांचा हा अनोखा प्रयोग होणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले असे माध्यम असेल जे फक्त मराठी भाषेतील  मनोरंजनास प्राधान्य देईल. 

 चित्रपट, नाटक, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डोक्युमेंटरी यांचा समावेशा असणारा  हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे. एवढच नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे देखील या ओटीटीवर उपलब्ध असेल. अगदी माफक अश्या दरात अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱ्या या ओटीटी ने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे.

 अभिनेता पुष्कर श्रोत्री याविषयी सांगतात की, “प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळाबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहत आहे”.  

प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीएमडी आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर हे याविषयी सांगतात की, "मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील".

Author

Recommended

PeepingMoon Exclusive