मराठीतील हा प्रसिध्द कोरिओग्राफर झळकला होता किंग खान शाहरुखसोबत 

By  
on  

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅकचा ट्रेंड सुरु आहे. या थ्रोबॅक ट्रेंडला फॉलो करत मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयावर  त्यांचे जुने फोटो पोस्ट करताना दिसत आहेत.
प्रसिध्द कोरिओग्राफर उमेश जाधव गेली कित्येक दिवस त्यांचे जुने फोटो पोस्ट करत आहेत. यात त्यांच्या खास आठवणी आहेत. नुकतेच त्यांनी काही खास फोटो पोस्ट केले आहेत. ही आठवण आहे त्यांनी काम केलेल्या एका हिंदी सिनेमाची. ‘ओह डार्लिंग यह है इंडिया’ य़ा हिंदी सिनेमात त्यांनी एक भूमिका साकारली होती.

आणि याच सिनेमाच्या निमित्ताने उमेश यांचे मेंटर अहमद खान यांची भेट झाली होती. या सिनेमात किंग खान शाहरुख होता. आणि या सिनेमाच्या निमित्ताने उमेश जाधव शाहरुखसोबत झळकले होते.

या आठवणीविषयी ते लिहीतात की, “थ्रोबॅक, ‘ओह डार्लिंग यह है इंडिया’.. मी यात एक भूमिका केली होती. तेव्हाच मी माझे मेंटर कोरिओग्राफर, दिग्दर्शक अहमद खान यांना भेटलो होतो. आणि माझा बॉलिवुडमधील प्रवास सुरु झाला होता. कायमच्या आठवणी...”

 

Recommended

Loading...
Share