रंगभेदाचा मुद्दा हा कायम चर्चेत आलेला पाहायला मिळालाय. अमेरिकेतील जॉर्ज फ्लायडच्या हत्येनंतर हा मुद्दा पुन्हा अधोरेखीत होताना दिसत आहे. याच परिस्थितीत सोशल मिडीयावर विविध संदेश देणाऱ्या पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या. त्यातच फेअर एन्ड लव्हली क्रिमच्या नावात होणारा बदलही समोर आला. या सगळ्या गोष्टी पाहता रंगभेदावरील मुद्द्यावर एक अनोख्या थिमसह अभिनेत्री स्मिता गोंदकरने फोटोशुट केलं आहे. तपकिरी त्वचेचा रंग मेकअप स्वरुपात चेहऱ्यावर चढवून स्मिताने एक नवंं फोटोशुट केलं आहे.
स्मिताच्या या फोटोशुटचं कौतुक केलं जात आहे.
तिने या लुकमध्ये विविध फोटोशुट केलेले फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "तपकिरी रंग सुंदर आहे.. जेव्हा मी अमेरिकेतून परतले तेव्हा टॅन रंगाविषयी मला प्रेम निर्माण झालं. मला अजून आठवत आहे की सन बाथिंगसाठी घेतलेली मेहनत, पण कोणतिही त्वचेच्या सुरक्षेची काळजी घेतली नव्हती आणि माझी त्वचा खराब झाली. त्यानंतर माझी त्वचा आयुष्यभर नाजूक झाली. आता माहीत नाही की मी पुन्हा टॅन करू शकेल का. पण ही सिरीज हे माझ प्रेम आणि आदर आहे त्या सगळ्या प्रकारच्या त्वचेच्या रंगांसाठी. माझ्या या सिरीजमधील फोटो ब्राउन इज ब्युटीफुल ही भावना व्यक्त करतात कारण ते खरचं खूप सुंदर आहे."
पुढे ती लिहीते की, "खूप अशी यशस्वी मंडळी आहेत ज्यांनी जे विविध त्वचेच्या रंगांचे असतानाही त्यांनी उदाहरण समोर ठेवली आहेत. तेव्हा आपल्या त्वचेच्या रंगासोबत आनंदी राहुयात आणि कोणत्याही इतर रंगामध्ये स्वताला न बदलता हे स्विकार करूयात. स्वत:चा आणि इतरांच्या त्वचेचा रंग साजरा करूयात."
.