लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण ठप्प झालं होतं. मात्र आता हळूहळू चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजनवर जुने कार्यक्रम आणि जुने भाग प्रसारित करण्यात आले होते. मात्र आता चित्रीकरण सुरु झाल्याने कार्यक्रमांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमातील कलाकार, परिक्षक आणि सुत्रसंचालकसह संपूर्ण टीम सेटवर पोहोचली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते. ती देखील बऱ्याच महिन्यांनी चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने आनंदी आहे.
नुकतेच प्राजक्ताने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंना “मराठी स्वॅग विषय खल्लास” असं भन्नाट कॅप्शन तिने लिहीलय. खणाची साडी, नथ, चंद्रकोर असा मराठमोळा साज तिच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. प्राजक्ताच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले आहेत.