By  
on  

अभिनेत्री स्मिता तांबेचं शुभमंगल; जिवलग मैत्रिण रेशम टीपणीसची खास उपस्थिती

बॉलिवूडमधील लग्नसोहळ्यांनी नुकतीच विश्रांती घेतली असताना आता एक मराठमोळी अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. आपल्या हटके भूमिकांमधून बहारदार अभिनय साकारणारी  स्मिता तांबे ही अभिनेता वीरेंद्र द्विवेदी याच्यासह लग्नबंधनात अडकली आहे. 'जोगवा', '72 मैल' यांसारख्या सिनेमांमधून तिने गुणी अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत छाप पाडलीय.

स्मिता तांबे  हिने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत मुंबईत 18 जानेवारी रोजी लग्न केलं. विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार असून हे लग्न महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडलं आहे. या लग्नाचे खास फोटो स्मिताची जिवलग मैत्रिण रेशम टिपणीसने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BsxBKSogPYy/?utm_source=ig_embed

आपल्या मैत्रिणीला नववधूच्या रुपात पाहून रेशमचा आनंद गगनात मावत नव्हता. नांदा सौख्य भरे हा आशिर्वाद तिने या नवदाम्पत्याला दिला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive