'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोहोचली श्रेया बुगडे, चित्रीकरणाला अशी केली सुरुवात

By  
on  

जवळपास तीन ते चार महिन्यांनी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलेल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम बंद असल्याने सर्व प्रकारचं चित्रीकरण बंद होतं. मात्र आता टेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांचा आवडता आणि सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'च्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. 

  बऱ्याच महिन्यांनी सेटवर पोहोचल्यावर अभिनेत्री श्रेया बुगडे प्रचंड आनंदी दिसत आहे. सेटवर चित्रीकरणासाठी पोहोचताच तिने तिचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याने हे कलाकार आनंदी आहेत. शिवाय सेटवर नियमांचं पालन करत सुरक्षिततेची काळजी देखील घेत असल्याचं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is how we roll!!!! #MUA #myteam #chydshootingresumes #onsets #day1 #safetyfirst @zeemarathiofficial

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

श्रेयाने सेटवरील मेकअप करतानाचा आणि मास्क लावलेला फोटो पोस्ट केला. यात सेटवर कश्या पद्धतिने काळजी घेतली जात आहे हे देखील पाहायला मिळतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lets begin again... #day1 #chyd #resumingshoot #safetyfirst @zeemarathiofficial

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

Recommended

Loading...
Share