पाहा Photos : अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक अडकले लग्नबंधनात

By  
on  

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये आनंद ओक लिहीतात की, "जन्माच्या गाठी विधात्याने बांधलेल्या असतात असं म्हणतात. ही अनोखी गाठ विधात्यानेच बांधण्याचे ठरवले असावे म्हणून काल ही जन्मजन्मीची गाठ बांधली गेली..!! तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठिशी असूदेत..!!"

दोघांनी लॉकडाउनच्या काळात लग्न केलं असल्याने नियमांचं पालनही केलेलं आहे. दोघांनी या लग्नात मास्कचाही वापर केला आहे.

सोशल मिडीयावर या दोघांवर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

Recommended

Loading...
Share