By  
on  

पाहा Video : कीबोर्डवर हे गाणं वाजवत अमृता खानविलकरने गायलं हे गाणं

लॉकडाउनच्या काळात विविध गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळाला आहे. यातच काहींनी या वेळेचा सदुपयोग करून काहीतरी शिकायचं ठरवलं. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही असच काहीसं ठरवलं. आणि घरात असलेला कीबोर्ड हे वाद्य शिकायला सुरुवात केली. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अमृता सध्या कीबोर्ड शिकत आहे.

सोशल मिडीयावर अमृता कीबोर्ड वाजवण्याचे काही व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. यातच तिने एक खास व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती फक्त कीबोर्ड वाजवत नाही तर त्याच्यासोबत गाणही गात आहे. 

 

तेव्हा अमृता तिचा गायनाचा आणि वाद्य वाजवण्याचा हा छंद लॉकडाउनच्या या काळात पूर्ण करताना दिसत आहेत. 

हे सगळं पाहून अमृताचं संगीताविषयीचं प्रेम पाहायला मिळतय. तेव्हा कदाचीत आगामी काळात अमृता तिचं एखादं कव्हर साँग घेऊन येईल ही शक्यता देखील नाकारता येत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive