By  
on  

'खिडकीच्या पल्याड' या काव्यात्मक व्हिडीओत झळकली सोनाली कुलकर्णी

लॉकडाउनच्या काळात इतके दिवस घरात असताना घराच्याबाहेरील जगाशी जोडणारी खिडकी ही सध्या महत्त्वाचा भाग झाली आहे. असाच काहीसा विषय घेऊन 'खिडकीच्या पल्याड' हा एक काव्यात्मक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकली असून तिनेच या व्हिडीओसाठी काव्यवाचन केले आहे.

सोनाली कुलकर्णी सध्या दुबईत आहे आणि तिथेच तिने हा व्हिडीओ शुट केला आहे. 

गौरी सरनाईक यांचं हे काव्य असून सागर पाटील यांनी या व्हिडीओला संगीत दिलं आहे. सोनाली हा व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर पोस्टमध्ये लिहीते की, "आज ४ महीने झाले घरा पासून, कामा पासून लांब राहून.या दरम्यान खूप काही करत राहिले, short film, podcast, photoshoots....जगात कुठेही असो कामाबद्दल ची passion स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातूनंच निर्मिती झाली या छोट्याश्या प्रयत्नाची.."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज ४ महीने झाले घरा पासून, कामा पासून लांब राहून. या दरम्यान खूप काही करत राहिले, short film, podcast, photoshoots.... जगात कुठेही असो कामाबद्दल ची passion स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातूनंच निर्मिती झाली या छोट्याश्या प्रयत्नाची.. #खिडकीच्यापल्याड #Apoeticvideo LINK IN BIO नक्की पाहा....आणि आवडलं तर वाटून टाका #like #share #khidkichyapalyad By @videopalaceindia Music by @sagarmusical Poetry by @gourisarnaik Shot & edited by @yashkaklotar #streamingnow on audio platforms and @videopalaceindia ‘s #YouTube channel

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

व्हिडीओ पॅलेसचा हा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला असून सोनालीच्या आवाजाच आणि तिच्यावर चित्रीत झालेला हा व्हिडीओ पाहायला छान वाटतय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive