या मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे 'मास्क' कम्युनिकेशन

By  
on  

 शासनाच्या नियमांचं पालन करून विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही मालिकांचे तर नवे भागही प्रसारीत करण्यात आले आहेत. जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार आणि इतर तंत्रज्ञही आंनदी आहेत. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मनोरंजन विश्वाच काम ठप्प झालं आणि चित्रीकरणही बंद झाली होती. मात्र आता पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली असून शुटिंगची टीम आनंदी आहेत.

'हे मन बावरे' या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र नियमांचे पालन करत आणि सुरक्षिततेची काळजी घेत हे कलाकार काम करत आहेत. मग सेटवर मास्क घालून वावरणं असेल किंवा सॅनिटायझर वापरणं. जयंत पवार यांनी सोशल मिडीयावर या सेटवरील काही गमतीशीर फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टला मास्क कम्युनिकेशन असं मजेशीर कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. य़ा फोटो दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेता शशांक केतकरही दिसत आहे. मास्क आणि फेस शिल्ड घालून सुरु असलेला त्यांचा संवाद या फोटोत टिपला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"MASK" communication

A post shared by jayant pawar (@jp_insta_jp) on

 

 तेव्हा नियमांचे पालन करत सेटवर अशा गमती जमतीही सुरु असल्याचं पाहायला मिळतय. चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाल्याचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसतोय.

 

Recommended

Loading...
Share