अमृता खानविलकरला आठवले हे जुने दिवस, फोटोवर आल्या मजेशीर कमेंट्स

By  
on  

'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वात अभिनेत्री अमृता खानविलकरही स्पर्धक म्हणून दिसली होती. तिने जिद्दी आणि चिकाटीने या कार्यक्रमात अनेक थरारक स्टंट्स केले होते. आणि शो दरम्यानचा एक फोटो अमृताने पोस्ट केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अमृताचा हा लुक पाहायला मिळाला होता. 

मात्र हा फोटो पोस्ट करत जुन्या दिवसांच्या आठवणी तिने ताज्या केल्या आहेत. अमृताला जुने दिवस आठवत असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणते. मात्र शाळेतल्या गणवेशाप्रमाणे दिसणारा तिचा या फोटोतील पेहराव पाहून तिच्या पोस्टवर मजेशीर कमेंट्स पाहायला मिळाल्या. सध्या सुरु असलेल्या थ्रोबॅक ट्रेंड फॉलो करत अमृताने तिचा हा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#missing #olddays

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

अभिनेता अमेय वाघसह मनोरंजन विश्वातील तिच्या कित्येक मित्रमैंत्रीणींना या फोटोवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 

चाहत्यांना अमृताचा हा फोटो मात्र प्रचंड आवडला असतो हजारोच्या घरात लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

 

Recommended

Loading...
Share