By  
on  

भालेराव कुटुंब लवकरच येणार भेटीला, नवे भाग होणार प्रसारित

जवळपास चार महिने टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग प्रसारित होत होते. तर काही ठिकाणी जुन्या प्रसिद्ध मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र नुकतीच नियमांचं पालन करून मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आणि म्हणूनच मालिकांचे नवे भाग आता प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 

नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेचेही नवे भाग लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कारण भालेराव कुटुंब पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतय.

भालेराव कुटुंबाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि प्रभाकर, प्रशांत, रवी, उदय ही चार भावंडं सगळ्यांना आपलीशी वाटू लागली. लग्न होतंय की नाही, अशी परिस्थिती असताना रुक्मिणीबाईंचे नवस फळाला आले आणि काटे कुटुंबातल्या चार बहिणींशी चारही भावांची लग्नं एकाच मांडवात झाली. भालेरावांचं घर एकदाचं सुनांनी भरलं आणि रुक्मिणीबाईंचा जीव भांड्यात पडला.लग्न झालं तर खरं, पण आता चारही संसार सुखानं होतायत की नाही, अशी चिंता रुक्मिणीबाईंना लागून राहिली.  भालेराव कुटुंब अजून कोणत्या नवीन अडचणींना तोंड देईल आणि त्यातून कसं बाहेर पडेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे आणि आता या सर्वांची उत्तर घेऊन ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेचे नवीन भाग येत आहेत.

लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांची आणि भालेराव कुटुंबाची भेट झाली नव्हती, पण आता मात्र मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं असून 20 जुलैपासून हेआवडतं भालेराव कुटुंब सगळ्यांच्या भेटीला पुन्हा येतंय.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive