By  
on  

'समांतर-2' लवकरच येणार भेटीला, स्वप्निल आणि नितीश भारद्वाज पुन्हा दिसणार आमने सामने

प्रसिद्ध पौराणीक मालिकांमध्ये कृष्णाची भूमिका साकारणाऱ्यांमध्ये दोन नावं कायम प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत ती म्हणजे अभिनेता नितीश भारद्वाज आणि स्वप्निल जोशी. या दोन्ही अभिनेत्यांनी टेलिव्हीजनवर साकारलेले कृष्ण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र योगायोग असा की हे दोन्ही कलाकार 'समांतर' या वेबसिरीजच्या माध्यमातून एकत्र झळकले. 

'संमातर' या वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाउनच्या काळात ही वेबसिरीज आल्याने घरबसल्या या वेबसिरीजचा थरार प्रेक्षकांनी ओटीटीवर अनुभवला. वेबसिरीजमध्ये सुदर्शनचक्रपाणीचा शोध आणि त्याचं गुढ या सगळ्या गोष्टी पाहणं रंजक ठरलं. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असून अभिनेता स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडीत आणि नितीश भारद्वाज यांच्यासह इतर कलाकारांची फळी या सिरीजमध्ये पाहायला मिळाली होती.

आता लवकरच 'समांतर -2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेली कहाणी दुसऱ्या भागात पुढे जाताना दिसेल. या सिरीजच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शित सतीश राजवाडे यांनी केलं होतं आणि आता दुसऱ्या भागासाठी समीर विद्वांस दिग्दर्शन करतील.

 

. नुकतच अभिनेता स्वप्निल जोशीने नितीश भारद्वाज यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून लवकरच समांतर 2 घेऊन येत असल्याचं पोस्ट करून उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive