प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांच्या स्मृतिदिनी अभिनेता स्वप्निल जोशीने त्यांना आदरांजली वाहणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर केली होती. त्यावरून नेटकरी नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्या पोस्टमध्ये जरी शब्द चुकले असले तरी हेतू योग्य असल्याचं अभिनेता स्वप्निल जोशीने स्पष्ट केलं आहे. स्वप्निलने त्याची चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यासाठी त्याने एक स्टेटमेंट सोशल मिडीयावर पोस्ट केलं आहे.
या पोस्टमध्ये स्वप्निल जोशी म्हणतो की, "चूक मान्य करणं हे ती सुधारण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल !, निळूभाऊंना आदरांजली वाहताना माझा हेतू योग्य होता पण शब्द चुकले ! त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो ! व्यक्त होताना मनात आदर होता, आजही आहे आणि नेहमी राहील , इथे प्रश्न माझ्या आपल्या माणसांच्या प्रतिमेला स्वाभिमानाने मोठं करण्याचा आहे. त्याचबरोबर त्यांच्याप्रती असणाऱ्या माझ्याच मराठी माणसांच्या भावनांचा आहे. आणि तुम्ही ही चूक माझ्या लक्षात आणून दिलीत ! तुमचे मनापासून आभार चूक पोटात घ्या आणि असच प्रेम राहूद्या !"
निळूभाऊ ! ️️ pic.twitter.com/JHZWx3R1O8
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) July 17, 2020
स्वप्निलने ही पोस्ट केल्याने सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. हेतू योग्य असताना देखील चूक मान्य करण्याची वृत्ती स्वप्निलने दाखवली यासाठी नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.