अभिनेता अक्षय वाघमारेचं लग्न यावर्षी चर्चेत राहिलं. अरुण गवळी यांची मुलगी योगितासोबत तो याचवर्षी लॉकडाउनच्या काळात विवाहबंधनात अडकला. अरुण गवळी म्हणजेच डॅडी राहत असलेल्या दगडीचाळीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. आणि याच डॅडींच्या वाढदिवासानिमित्त अक्षयने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतरच्या बऱ्याच मुलाखतीत अक्षयने त्याचं अरुण गवळी यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी सांगीतलं आहे. शिवाय लॉकडाउनमध्ये पिपींगमून मराठी बोलताना अरुण गवळींना पत्र लिहीत असल्याचं सांगीतलं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अक्षयने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये अक्षयने अरुण गवळी यांच्यासोबतचा हळदी समारंभातील फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की,"दीन पददलितांची करुन सेवा, तुकोबारायांचे वाचले अभंग, जीवनाचे शिल्पकार आमुच्या, शंभो शिव शंकर नामात दंग ! आभाळाची करून सावली, दिली संकटात सर्वांना साथ, शांत मनी मूर्ती विठ्ठलाची, सदैव मस्तकी राहो तुमचा हात! केले आम्हास स्वावलंबी, देऊन कौतुकाची थाप, केले आईसारखे प्रेम, माया केली वारेमाप ! निळ्या नभात अरुणोदय झाला, पक्षी,पाखरे सुमधुर वाणी, भाग्य लाभले आम्ही लेकरे, गाऊ तुमच्या उदंड आयुष्याची गाणी !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! डॅडी"
अशी खास पोस्ट करून अक्षयने त्याचे सासरे अरुण गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.