By  
on  

कुशल बद्रिके आहे श्रेया बुगडेच्या आयुष्यातला 'जीवनावश्यक', अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

चला हवा येऊ द्या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचं श्रेय संपूर्ण टीमला जातं. शिवाय या कार्यक्रमात असलेले उत्तमोत्तम कलाकार आणि त्यांच्या विनोदाचं टायमिंग हे देखील कमाल असत. यापैकीच एक विनोदवीर आहे कुशल बद्रिके. विविध कलाकारांच्या नक्कली करणं आणि विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणं त्याला चांगलच जमत. आणि हाच अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस आहे.

कुशलवर सोशल मिडीयावरही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चला हवा येऊ द्या या शोमध्ये या दोघांची जोडी मंचावर एकत्र आली की काय कमाल करते याची प्रचिती कित्येकदा आली आहे. मात्र ऑफस्क्रिन या दोघांची चांगली मैत्रीदेखील आहे. श्रेयाने कुशलसोबतचा फोटो पोस्ट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजकाल दुसऱ्यांसाठी जीव पाखडणारे लोक खूप कमी भेटतात माझं नशीब थोरच म्हणायचं कि माझी अश्या एका अवलिया शी ८ वर्षापूर्वी मैत्री झाली . गेल्या आठ वर्षात आम्ही खूप काही share केलं , सुख दुःख आणि हो immigration form भरायला लागणाऱ्या पेनापासून ते परदेशात मी केलेल्या शॉपिंग बॅग्सच्या वजनापर्यंत . कारण खूप प्रवास केला आम्ही एकत्र आणि आमच्या मैत्रीने पण....हा माणूस काय आहे हे कदाचित त्याला हि माहित नाही .. मी मात्र जीवतोडून एखाद्यावर प्रेम कसं करावं हे त्याच्याकडून शिकलेय आणि आयुष्य कसं जगावं हेही.... ह्या Lockdown मध्ये एक शब्द आपण सरखा वापरतोय ... 'जीवनावश्यक’ माझ्या आयुष्यातला 'जीवनावश्यक' happy birthday @badrikekushal Pas: this picture pretty much sums up what we both want from life..... a VACATION in GOA...........

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

श्रेया या पोस्टमध्ये लिहीते की, "आजकाल दुसऱ्यांसाठी जीव पाखडणारे लोक खूप कमी भेटतात. माझं नशीब थोरच म्हणायचं कि माझी अश्या एका अवलिया शी ८ वर्षापूर्वी मैत्री झाली . गेल्या आठ वर्षात आम्ही खूप काही शेयर केलं , सुख दुःख आणि हो immigration form भरायला लागणाऱ्या पेनापासून ते परदेशात मी केलेल्या शॉपिंग बॅग्सच्या वजनापर्यंत. कारण खूप प्रवास केला आम्ही एकत्र आणि आमच्या मैत्रीने पण....हा माणूस काय आहे हे कदाचित त्यालाही माहित नाही.. मी मात्र जीवतोडून एखाद्यावर प्रेम कसं करावं हे त्याच्याकडून शिकलेय आणि आयुष्य कसं जगावं हेही....ह्या Lockdown मध्ये एक शब्द आपण सरखा वापरतोय ... 'जीवनावश्यक’, माझ्या आयुष्यातला 'जीवनावश्यक' वाढदिवसाच्या शुभेच्छा."

या पोस्टमध्ये श्रेयाने त्यांच्या मैत्रीतील हे नातं आणि या भावना व्यक्त केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive