By  
on  

हे नाटक रंगभूमीवर घेऊन येतोय सुबोध भावे

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गुणी अभिनेता सुबोध भावे लवकरच एक गाजलेलं नाटक घेऊन रंगभूमीवर येतोय. अश्रूंची झाली फुले हे नाटक तो पुन्हा नव्याने सादर करणार आहे. एका युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली.

"प्रा. वसंत कानेटकर यांचे अश्रूंची झाली फुले हे गजलेले नाटक आम्ही आम्ही पुन्हा रंगभूमीवर आणणार आहोत. साधारणपणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाटकाचा शुभारंभ होईल. पाच-सहा वर्षे नाटकापासून खूप दूर होतो. कारण वेळच नव्हता त्याची तालीम करायला, प्रयोग करायला. आता या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर पाऊल ठेवण्याचा विचार आहे", असे सुबोध म्हणाला .

आत्तापर्यंत आपल्या विविध भूमिकांमधून सुबोधने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीची त्याला पहिल्यापासूनच आवड आहे.  आता त्याच्या नाटकातील अभिनयाची सर्वांना आतुरता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive