By  
on  

पाहा Video : अभिनेत्री अमृता देशमुखने किबोर्डवर वाजवलं हे गाणं

लॉकडाउनच्या काळात घरात बसून कित्येकांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. काहींनी विविध गोष्टी शिकल्या तर काहींनी त्यांचे छंद जोपासले. अभिनेत्री अमृता देशमुख सध्या या लॉकडाउनच्या काळात किबोर्ड हे वाद्य शिकतेय.

काही कालावधीसाठी अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ब्रेकही घेतला होता. मात्र पुन्हा परतल्यापासून ती सोशल मिडीयावर सक्रिय झाली आहे. ती शिकत असलेल्या किबोर्डवरील विविध गाणी ती वाजवून त्याचे व्हिडीओ पोस्ट करतेय. एका व्हिडीओवर तर चक्क अभिनेता आयुष्मान खुरानानेही कमेंट केली होती. नुकतच तिने आणखी एक गाणं या किबोर्डवर प्ले केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Of course I’ll Be There For My Friends • • #AmateurKeyboardist #BabySteps

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

 

सोशल मिडीयावरील तिच्या चाहत्यांनाही तिचा हा व्हिडीओ भलताच आवडलेला दिसतोय. म्हणूनच तिच्या व्हिडीओवर लाईक्स  आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive