By  
on  

'ठाकरे'च्या स्क्रिनींग दरम्यान घडलं हे मानापमान नाट्य

अवघ्या महाराष्ट्राचं आणि तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान एक वेगळाच सीन घडल्याचं नुकतंच एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. 23 जानेवारी रोजी म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त वरळीतील आयनॉक्स सिनेमागृहात 'ठाकरे' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. पण यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे अचानक पत्नी आणि मुलांसह तडक निघून गेले व निर्माते संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढच्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण नाट्य व्हिडीमध्ये स्पष्ट कैद झालं आहे.

दिग्दर्शक अभिजीत पानसे हे जरा उशिरा पोहोचले. त्यावेळी सिनेमागृहात बरीच गर्दी होती. पानसे हे सहकुटुंब सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबाला बसायला नीट जागा न  मिळाल्याचे काहींचे म्हणणे आहे. म्हणूनच पानसे हे अपमानित झाल्याने तेथून उठून गेल्याचे बोलले जात आहे.

[video width="400" height="220" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/51194708_598417213931756_3745155999724470272_n.mp4"][/video]

दरम्यान या वादामुळे शिवसेना आणि मनसेतला छुपा वाद पुन्हा अधोरेखित झाला आहे. यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यांनी "मा.बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिका ला सुद्धा प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान नाही करायचे हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करण्याऱ्या ना सुद्धा कळला नाही"    असे ट्विट करत निर्माते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1088327720566587392

आता हे संपूर्ण नाट्यमय प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणं,औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive