By  
on  

आई प्रिया बेर्डेकडून मुलगी स्वानंदी बेर्डेला सोशल मिडीयावर मिळाल्या खास शुभेच्छा

 मराठी सिनेसृष्टीतील एका स्टारकीडने अजून या मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलेले नसतानाही तिची प्रचंड चर्चा होत आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे ही मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. भाऊ अभिनय बेर्डेने सिनेविश्वात पदार्पण केलेलं आहे. मात्र स्वानंदीही लवकरच डेब्यू करणार असल्याचं बोललं जातय.

 

स्वानंदीच्या वाढदिवसानिमित्ताने आई प्रिया आणि भाऊ अभिनयने सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत. त्या लिहीतात की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझं सगळं काही आहे, माझी बच्च प्रिय स्वानू, खूप प्रेम."
सोशल मिडीयावर स्वानंदीचे सुंदर फोटो हे चर्चेत असतात. तेव्हा तिचा चाहतावर्गही सोशल मिडीयावर आत्ताच तयार झाला आहे.सोशल मिडीयावर वाढदिवसानिमित्ताने स्वानंदीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

स्वानंदी सिनेविश्वात कधी डेब्यू करणार याचीच सध्या तिच्या सोशल मिडीयावरील चाहत्यांना उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive