पाहा Photos : या गोष्टीमुळे अभिनेत्री प्रिया बापट झाली आनंदी

By  
on  

सध्या सोशल मिडीयावर लॉकडाउनच्या काळात कला विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. यातच काही कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करताना दिसले. अभिनेत्री प्रिया बापटही या दरम्यान विविध गोष्टी पोस्ट करताना दिसली. विशेषकरून प्रिया तिचे फिटनेस आणि वर्कआउट विषयक पोस्ट करत होती. त्यानंतर सुंदर साड्यांमधील प्रियाचे  फोटोही पाहायला मिळाले होते. 

  नुकतच प्रियाने तिचे काही आनंदी फोटो पोस्ट केले आहेत. या आनंदाचं कारणही तिने यात सांगीतलं आहे. नुकत्याच परिधान केले सुंदर आउटफिटमुळे प्रिया प्रचंड आनंदी झाल्याचं दिसतय. तिला या सुंदर आउटफीटमधील फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये प्रिया लिहीते की, "मी किती खूश आहे हे सुंदर आउटफीट घालून. याचं मऊ कॉटन जणू तुम्हाला मिठी मारतं. हे नक्कीच यंदाच्या राखीसाठी माझी निवड असेल."

 

ही पोस्ट लिहून प्रियाने हे आउटफीट तयार केलेल्यांना धन्यवाद करतेय. विशेष म्हणजे अभिनेता आणि प्रियाचा पती उमेश कामतने प्रियाचे हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.   

 

Recommended

Loading...
Share