By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीचं हे सुंदर रुप पाहून तु्म्हालाही बसेल धक्का, हा फोटो केला पोस्ट

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेने वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. पण या मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत. या मालिकेतील सुमी आणि समरची जोडी आता लोकप्रिय झाली आहेत. त्यातच त्यांचा मालिकेतील लुक वेगळा आहे. मात्र जेव्हा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लुक आणि फोटो जेव्हा समोर येतात तेव्हा चाहत्यांना ते पाहण्याचीही उत्सुकता असते. मात्र सुमीचा एक फोटो पाहुन चाहत्यांना धक्का बसला असेल एवढं नक्की.

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत सुमीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता धोंगडेने तिचा एक सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.  या फोटोत अमृता जणू परी दिसतेय. पांढऱ्या रंगाच्या या सुंदर ड्रेसमध्ये अमृताचं सौंदर्य खुलून दिसतय. चाहत्यांनाही तिचा हा फोटो प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A girl should be like a butterfly. Pretty to see, hard to catch♥️♥️♥️♥️ . . . #amrutadhongade #mrsmukhyamantri

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

 

अमृता या पोस्टमध्ये लिहीते की, "मुलगी ही फुलपाखरूसारखी असायला हवी, बघायला सुंदर आणि पकडणे कठीण." या फोटोला अगदी साजेसं कॅप्शन तिने लिहीलय.

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतून अमृता सुमीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive