By  
on  

पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीच्या या सिनेमाला झाली 3 वर्षे पूर्ण

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. त्यांची केमिस्ट्री स्क्रिनवर छान दिसते. त्यांची हीच केमिस्ट्री 'भेटली तू पुन्हा' या सिनेमात पाहायला मिळाली होती. 

पूजा आणि वैभवच्या याच सिनेमाला नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पूजाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सिनेमाच्या गाण्याच्या शुटदरम्यानची मस्ती या व्हिडीओत पाहायला मिळतेय.

या पोस्टमध्ये पूजा लिहीते की, "'भेटली तू पुन्हा' ची 3 वर्षे, धन्यवाद चंद्रकांत कानसे मला ही सुंदर संधी दिल्याबद्दल आणि अश्विनी सारंगची माझी आवडती भूमिका दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद संजय जामखांडी ही वेडसर भूमिका तयार करण्यासाठी."

 

या सिनेमातील 'जानू जानू' गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडीओ पूजाने आठवण म्हणून पोस्ट केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive