अभिनेत्री सखी गोखलेचा नुकताच वाढदिवस झाला. पति सुव्रत जोशीसोबत तिने हा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
या पोस्टमध्ये सखी लिहीते की, "पहिल्यांदा, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना ज्यांनी मला शुभेच्छा पाठवल्यात. मी खूप आभारी आहे. माफ करा त्यापैकी इथे काही शेयर करत नाही. खरतर हा दिवस फोनमध्ये घालवणं चुकीचं ठरेल. मी 24 तास खूप मजा केली. मध्यरात्रीपासून सुरुवात करत, सुव्रतने बनवलेला चविष्ट केक आणि माझे फ्लॅटमेट्सोबत हे सेलिब्रेट केलं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर माझ्या अम्माने पाठवलेली सुर्यफुलांचा गुच्छ दरवाज्यात होत्या. नास्त्याला मग केक खाल्ला. मग आम्ही थेम्सला गेला. कॉफी प्यायलो, खूप गप्पा मारल्या. आणि दिवसाचा शेवट पकाउ जोक करुन, दोन सिनेमे, पिझ्झा आणि केकने केला."
अशाप्रकारे सखीने तिचा वाढदिवस साजरा केला. या फोटोंमध्ये तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास क्षण पोस्ट केले आहेत.