By  
on  

रितेश देशमुखचा मुलगा राहीलला आहे या गोष्टीची आवड, संगीतकार विशाल - शेखरला पाठवला व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नि जेनेलिया त्यांच्या मुलांसोबत आणि परिवारासोबत सध्याचा लॉकडाउनमध्ये वेळ घालवत आहेत. यातच रितेश आणि जेनेलिया या सुपर कपलचे विविध व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर तर त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. यातच रितेश त्याच्या मुलांविषयीच्या पोस्टही करताना दिसतो. 

 

नुकताच रितेशने मुलगा राहीलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. राहील आय पॅडमध्ये म्युझिक कम्पोझिशन करतानाचा हा स्वीट व्हिडीओ आहे. लॉकडाउनच्या काळात ही लहान मुलं देखील त्यांचे विविध छंद जोपासत आहेत. मात्र रितेशला राहीलच्या या मस्तीत त्याचं पुढचं भविष्य दिसतय की काय, त्याने लगेच हा  व्हिडीओ प्रसिद्ध संगीतकार विशाल - शेखऱ यांना दाखवला. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पोस्ट करून रितेश लिहीतो की, "प्रिय विशाल दादलानी आणि शेखर रवजियानी. तुम्हाला यात काही भविष्य दिसतय का ? क्वारंटाईन म्युझिक कम्पोझिशन जोरात सुरु आहे. म्युझिकल मायस्ट्रो राहील आणि दिवीयाना."

 सोशल मिडीयावर राहीलचा हा गोंडस व्हिडीओ पसंत केला जातोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive