हिंदी टेलिव्हिजन विश्वात पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारी आहे. 2009मध्ये आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक भाग वाटू लागल्या होत्या.
अभिनेत्री प्रिया मराठेही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होती. मालिकेतील मुख्य पात्र अर्चनाच्या बहिणीची म्हणजेच अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका प्रियाने साकारली होती. या मालिकेमुळे प्रियाचाही एक चाहतावर्ग तयार झाला होता. नुकतच प्रियाने या मालिकेच्या आठवणीत मालिकेतील एक सीन सोशल मिडीयावर शेयर केला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेच्या फॅन क्लबने पोस्ट केलेला हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओत प्रिया तिच्या आईला एस्केलेटरवरून कशी घेऊन जाते असा हा सीन आहे. या सीनमध्ये आई-मुलीचं नातं दाखवण्यात आलं आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "गोड आणि गोंडस, दरदिवशीचा अनुभव हा पवित्र रिश्ताचा महत्त्वाचा भाग होता. प्रेक्षकही या घटना रिलेट करू शकत होते. प्रेक्षक या शोसोबत जोडले गेले होते आणि आमच्याशी देखील. मी या आठवणी कायम लक्षात ठेवेल."
या मालिकेतील प्रत्येकाशी प्रियाची चांगली मैत्री होती आणि अजूनही ही मैत्री कायम आहे. अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहेर आणि प्रिया या आजही चांगल्या मैत्रिणी आहेत.